मिनी ट्रॅक्टर योजना 2026-27 साठी अर्ज सुरू आहेत - नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करामिनी ट्रॅक्टर योजना 2026-27 साठी अर्ज सुरू आहेत - नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
वापर मार्गदर्शक
नोंदणी, अर्ज भरणे, सद्यस्थिती पाहणे व दुरुस्ती — प्रत्येक पायरी सविस्तर.
वापर मार्गदर्शक — अर्जदार (बचत गट)
मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा, स्थिती कशी पाहावी व अर्ज दुरुस्त कसा करावा याची सविस्तर माहिती.
१. नोंदणी कशी करावी
मुख्यपृष्ठावरील "नोंदणी करा" बटणावर क्लिक करा.
बचत गटाचे नाव, मोबाइल नंबर (हाच आपला युझर आयडी असेल) व स्वतःचा पासवर्ड सेट करा.
अध्यक्ष व सचिव यांचे पूर्ण नाव (नाव · वडिलांचे नाव · आडनाव), प्रवर्ग व मोबाइल भरा.
पूर्ण पत्ता, जिल्हा, तालुका व ६-अंकी पिन कोड भरा.
बँकेचे नाव, ९–१८ अंकी खाते क्रमांक (दोनदा) व IFSC कोड भरा.
फॉर्मच्या तळाशी ईमेल टाका (OTP पडताळणी आवश्यक असल्यास), सुरक्षा प्रश्न सोडवा व "नोंदणी सबमिट करा".
२. लॉगिन कसे करावे
मोबाइल नंबर किंवा ईमेल यापैकी कोणत्याही एकाने व पासवर्डने लॉगिन करा.
पासवर्ड विसरल्यास "पासवर्ड विसरलात?" वापरा.
३. अर्ज कसा भरावा
लॉगिननंतर "नवीन अर्ज" वर जा. अर्ज ४ टप्प्यांत भरला जातो.
टप्पा १: ट्रॅक्टर माहिती — वाहन परवाना / प्रशिक्षण प्रमाणपत्र असल्यास "होय" निवडून तपशील भरा.
टप्पा २: आर्थिक तपशील — एकूण किंमत टाका; अनुदान (कमाल ₹३.१५ लाख) व स्वहिस्सा आपोआप मोजला जातो.
टप्पा ३: सदस्य माहिती — प्रत्येक सदस्याचे नाव, जन्मतारीख (वय आपोआप), प्रवर्ग, आधार व मोबाइल भरा.
टप्पा ४: कागदपत्रे — प्रत्येक सदस्याचे आधार/जात/रहिवासी व गटाची कागदपत्रे अपलोड करा.
प्रत्येक टप्प्यावर माहिती आपोआप सेव्ह होते; जोडलेली कागदपत्रे लगेच सर्व्हरवर अपलोड होतात.
सुरक्षा प्रश्न सोडवून "अर्ज सबमिट करा" दाबा.
४. अर्जाची स्थिती कशी पाहावी (Track)
डॅशबोर्ड किंवा "माझे अर्ज" मध्ये अर्जाची सद्यस्थिती दिसते.
अर्ज पाहा (👁) वर क्लिक करून संपूर्ण तपशील, अर्जाचा प्रवास (timeline) व अधिकाऱ्यांचे शेरे पाहता येतात.